HomeनांदेडSatyagraha : सोनम वांगचूंग यांच्या समर्थनार्थ महात्मा गांधी पुतळ्यासमोर सत्याग्रह

Satyagraha : सोनम वांगचूंग यांच्या समर्थनार्थ महात्मा गांधी पुतळ्यासमोर सत्याग्रह

भ्रष्टाचार विरोधी आंदोलन न्यास तर्फे प्रधानमंत्री यांना निवेदन

नांदेड| ज्येष्ठ समाजसेवक तथा शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास (महाराष्ट्र), जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले.

नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची जबाबदारी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. या मागण्यांसाठी सोनम वांगचुक उपोषण करत असून, केंद्र सरकारने त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन जनभावनांचा विचार करावा आणि त्यांचे उपोषण सोडवून त्यांचे प्राण वाचवावेत, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली.

या सत्याग्रहात ॲड. प्रदीप नागापूरकर, बालाजी कोम्पलवार, आदित्य भांगे, बालाजीराव पवार यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments