HomeनांदेडHunger stricke : आश्वासनांची फसवणूक? शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा

Hunger stricke : आश्वासनांची फसवणूक? शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा

हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर नगरपंचायत प्रशासनाच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने थेट लढाईचा पवित्रा घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा देण्याच्या मागणीवरून पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

युवा तालुकाध्यक्ष माधव किशन शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत प्रशासनावर आरोप करत सांगितले की, “फेब्रुवारी व मार्च महिन्यात उपोषण केल्यानंतर १५ एप्रिलपर्यंत जागा देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. ही सरळसरळ फसवणूक आहे असे मुन्नाभाऊ शिंदे यांनी म्हंटले आहे.”

२१ एप्रिलपासून उपोषण – या पार्श्वभूमीवर, २१ एप्रिल २०२६ पासून नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न – शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे शिवप्रेमींत नाराजी वाढत असून, येत्या काही दिवसांत आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता प्रशासन या इशाऱ्याला कसा प्रतिसाद देते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments