Blog

Barul ; बारूळ येथील यात्रा मध्ये आरोग्य शिबीर

कंधार l आज महादेव देवस्थान बारुळ ता. कंधार येथे भव्य यात्रे निमित्त प्रा.आ. केंद्र बारुळ तर्फे भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख मॅडम व तालुका आरोग्य अधिकारी डॉ रमेश गवाले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून हे शिबीर दर्शनासाठी येणाऱ्या गरजु भाविकांना आरोग्य सेवा देणे व शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या आरोग्य विषयक विविध योजना व सेवा यांची प्रसिद्धी करणे साठी आयोजीत करण्यात आले असून हे शिबीर दि.३०,३१ मार्च व १ एप्रील तिन दिवस महादेव मंदिर देवस्थान बारुळ येथे ठेवण्यात आलेले आहे. यात १४ वर्ष पूर्ण झालेल्या १५ वर्षापर्यंतच्या सर्व मुलींना एच.पी.व्ही. लसीचे महत्व या बाबत माहिती देण्यात येणार आहे.

IMG 20260330 WA0008 Barul ; बारूळ येथील यात्रा मध्ये आरोग्य शिबीर

या शिबिराचे उद्घाटन महादेव मंदिर देवस्थान पंच कमेटीच्या वतिने फित कापून करण्यात आले. या वेळी श्री बोडलवार साहेब मा.जि.प. सदस्य, दिगांबर पाटील वडजे मा. पं.स. सद्दस्य, बालाजीराव गालशेटवार समिती सचीव, बाळू कोल्हे, श्री कांबळे मामा, पत्रकार श्री वाघमारे उपस्थित होते.

IMG 20260330 WA0010 Barul ; बारूळ येथील यात्रा मध्ये आरोग्य शिबीर

प्रा आ. केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. एच. के. साखरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. दिक्षा कांबळे, डॉ. सागर तातोडे , डॉ अंबीका लाटकर,श्री आप्पाराव पोले, आरोग्य सहाय्यक बाबाराव येलुरे, एल. एच. वि. श्रीमती तेलंगे, श्रीमती वंदना मंदावाड, हेमा सोनटक्के, अविनाश भांड, विठ्ठल जाधव, राहुल कांबळे, दिनेश कुलुलवाड, शाहेद पठाण,सुमित चौडेकर, ओम दुधाट यांनी शिबीर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!