Barul ; बारूळ येथील यात्रा मध्ये आरोग्य शिबीर
कंधार l आज महादेव देवस्थान बारुळ ता. कंधार येथे भव्य यात्रे निमित्त प्रा.आ. केंद्र बारुळ तर्फे भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख मॅडम व तालुका आरोग्य अधिकारी डॉ रमेश गवाले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून हे शिबीर दर्शनासाठी येणाऱ्या गरजु भाविकांना आरोग्य सेवा देणे व शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या आरोग्य विषयक विविध योजना व सेवा यांची प्रसिद्धी करणे साठी आयोजीत करण्यात आले असून हे शिबीर दि.३०,३१ मार्च व १ एप्रील तिन दिवस महादेव मंदिर देवस्थान बारुळ येथे ठेवण्यात आलेले आहे. यात १४ वर्ष पूर्ण झालेल्या १५ वर्षापर्यंतच्या सर्व मुलींना एच.पी.व्ही. लसीचे महत्व या बाबत माहिती देण्यात येणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन महादेव मंदिर देवस्थान पंच कमेटीच्या वतिने फित कापून करण्यात आले. या वेळी श्री बोडलवार साहेब मा.जि.प. सदस्य, दिगांबर पाटील वडजे मा. पं....
