नांदेडक्राईमपरभणी

Rpf Action : ऑपरेशन ‘यात्री सुरक्षा’ अंतर्गत आरपीएफची धडक कारवाई

परभणी रेल्वे स्थानकावर दोन आरोपी अटकेत

नांदेड| रेल्वे सुरक्षा बल (RPF) नांदेड विभागाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत यशस्वी कारवाई करत दोन चोरीच्या आरोपींना अटक केली आहे.

पहिली घटना २५ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १२:३० वाजता परभणी रेल्वे स्थानक येथे घडली. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर RMS कार्यालयाजवळ गस्त घालत असताना सहाय्यक उपनिरीक्षक अमोल वावळे यांनी एका संशयित व्यक्तीस प्रवाशांचे सामान चोरण्याचा प्रयत्न करताना पकडले.

अजय (रा. बुरहानपूर, मध्य प्रदेश) असे आरोपीचे नाव असून, त्याला ताब्यात घेऊन शासकीय रेल्वे पोलीस (GRP) परभणी यांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

IMG 20260327 WA0010 Rpf Action : ऑपरेशन ‘यात्री सुरक्षा’ अंतर्गत आरपीएफची धडक कारवाई

दुसरी कारवाई त्याच दिवशी ट्रेन क्रमांक १७२०८ एक्सप्रेसमध्ये छत्रपती संभाजीनगर – लासूर दरम्यान करण्यात आली. RPF पथकाने S-08 डब्यात संशयास्पद हालचाल करणाऱ्या आकाश (वय २७, रा. अहमदनगर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ₹२७,९९९ किमतीचा Vivo मोबाईल जप्त करण्यात आला.

चौकशीत त्याने मोबाईल चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर आरोपीस GRP छत्रपती संभाजीनगर यांच्या ताब्यात देण्यात आले असून भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवायांमुळे नांदेड विभागातील RPF कर्मचाऱ्यांची सतर्कता आणि गुन्हे रोखण्याची क्षमता पुन्हा अधोरेखित झाली आहे. संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित रेल्वे अधिकाऱ्यांना कळवा किंवा RPF हेल्पलाईन १८२ वर संपर्क साधा.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!