लातूर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांकरिता एका मोहिमेची सुरुवात -NNL

लातूर| तण व्यवस्थापन उपायांसाठी जागरुक बनिये, पायना चुनिये या टॅगलाइनसह एका आकर्षक मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. प्रभावी तण व्यवस्थापन आणि उत्तम पिकासाठी तणनाशकाची खरेदी करताना कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पायना मार्क शोधण्याची सवय लावणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

महाराष्ट्रात कापूस पेरणीचा हंगाम सुरू झाल्याची योग्य वेळ साधत ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. योग्य तणव्यवस्थापन उपाय निवडताना कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेडची ही मोहीम प्रकाश टाकते.तसेच बियाणे पेरण्यापासून सक्रिय फुलोरापर्यंत तणव्यवस्थापनाचे विस्तृत पर्याय उपलब्ध करून देणे, पिकाची अवस्था, पीक-तण स्पर्धा कमी करणे आणि कपाशीच्या मजबूत वाढीस चालना देणे यासाठी देखील उत्पादनांचा पायना ब्रँड सक्रिय आहे.

जीव्हीएल हिटवीड,हिटवीड मॅक्स आणि मॅक्सकॉट ही आपली तीन कापूस तणव्यवस्थापन उत्पादने पायना ब्रँड अंतर्गत विकते आहे.या मोहिमेवर भाष्य करताना, अनिल चौबे म्हणाले, “पिकांमधील अंतर जास्त असल्याने कापसावर तणांचा 45-50 टक्के पर्यंत परिणाम होतो. यासाठीच आम्ही डिजिटल मोहीम चालवतो आहोत. प्रभावी तण नियंत्रणाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि आमच्या नाविन्यपूर्ण उपायांसह सक्षम बनण्यासाठी शेतकऱ्यांनी उत्पादनांचा पायना ब्रँड निवडावा.

कमी परिणामकारक पर्यायी उपाय निवडू नयेत. पायना च्या साहाय्याने शेतकरी पीक-तण स्पर्धा कमी करू शकतात. कापसाचे मजबूत पीक घेऊ शकतात. आणि त्यांचे उत्पन्न आणि नफा जास्तीत जास्त वाढवू शकतात.”“माहितीचा एक मजबूत स्रोत म्हणून डिजिटल प्लॅटफॉर्म हा शेतकरी समाजामध्ये लोकप्रिय आहे. त्यामुळे नवीन काळातील या व्यासपीठाचा फायदा घेऊन, आम्ही आमच्या कापूस शेतकऱ्यांशी मजबूत संबंध निर्माण करतो आहोत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button