HomeनांदेडVashi bridge : चिंचोर्डी - वाशी नजीक बंधारा-पुलावर भ्रष्टाचाराचा स्फोट; ‘मातीमिश्रित’ काँक्रीटमुळे...

Vashi bridge : चिंचोर्डी – वाशी नजीक बंधारा-पुलावर भ्रष्टाचाराचा स्फोट; ‘मातीमिश्रित’ काँक्रीटमुळे जीविताला धोका..!

हिमायतनर, अनिल मादसवार| तालुक्यातील आदिवासी बहुल भागात असलेल्या चिंचोर्डी परिसरातील वाशीनजीक बंधारा कम पुलाच्या कामात गंभीर गैरप्रकार उघडकीस येत असून, कंत्राटदाराने दर्जाहीन आणि ‘मातीमिश्रित’ काँक्रीट वापरल्या जात असल्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगांवकर यांनी केला आहे. तात्काळ बंधारा पुलाच्या कामात दुरुस्ती झाली नाही तर जलसंधारण विभागाच्या विरोधात जन आंदोलन छेडावे लागेल असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या आदिवासीबहुल भागातील वाशी नजीक कोट्यवधींचा निधी खर्च करून बंधारा कम पुलाचे काम किनवट येथील एका ठेकेदार मार्फत केले जात आहे. काम पूर्ण होण्याआधीच बंधारा पुलाच्या कामाला मोठ्या भेगा पडल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, हा बंधारा परिसरातील शेतकरी व रस्त्याच्या वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असून, ‘मृत्यूचा सापळा’ बनण्याची भीती व्यक्त होत आहे. अशा प्रकारचे निकृष्ट काम सुरू असतानाही संबंधित जलसंधारण विभागाचे वरिष्ठ व कनिष्ठ अभियंता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आपले उखळ पांढरे करून घेत आहेत की काय..? अशी काही व्यक्त केली जात आहे.

निकृष्ट साहित्य वापरून शासनाची व जनतेची उघड लूट संबंधित ठेकेदार व अभियंत्याकडून करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाकडे संबंधित विभागाचे अभियंते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची चर्चा रंगत असून, कंत्राटदारावर कोणाचे राजकीय संरक्षण आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

wamanrao patil Vashi bridge : चिंचोर्डी - वाशी नजीक बंधारा-पुलावर भ्रष्टाचाराचा स्फोट; ‘मातीमिश्रित’ काँक्रीटमुळे जीविताला धोका..!

तातडीने यां रस्ता व पुलाच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली असून, त्यामुळे या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच कंत्राटदार एजन्सी चे नाव कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे, अशी जोरदार मागणी केली आहे. प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाही, तर तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही वामनराव पाटील वडगावकर यांच्यातर्फे देण्यात आला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments