Wednesday, May 13

Tag: concrete poses a threat to lives..!

Vashi bridge : चिंचोर्डी – वाशी नजीक बंधारा-पुलावर भ्रष्टाचाराचा स्फोट; ‘मातीमिश्रित’ काँक्रीटमुळे जीविताला धोका..!

Vashi bridge : चिंचोर्डी – वाशी नजीक बंधारा-पुलावर भ्रष्टाचाराचा स्फोट; ‘मातीमिश्रित’ काँक्रीटमुळे जीविताला धोका..!

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनर, अनिल मादसवार| तालुक्यातील आदिवासी बहुल भागात असलेल्या चिंचोर्डी परिसरातील वाशीनजीक बंधारा कम पुलाच्या कामात गंभीर गैरप्रकार उघडकीस येत असून, कंत्राटदाराने दर्जाहीन आणि ‘मातीमिश्रित’ काँक्रीट वापरल्या जात असल्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगांवकर यांनी केला आहे. तात्काळ बंधारा पुलाच्या कामात दुरुस्ती झाली नाही तर जलसंधारण विभागाच्या विरोधात जन आंदोलन छेडावे लागेल असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या आदिवासीबहुल भागातील वाशी नजीक कोट्यवधींचा निधी खर्च करून बंधारा कम पुलाचे काम किनवट येथील एका ठेकेदार मार्फत केले जात आहे. काम पूर्ण होण्याआधीच बंधारा पुलाच्या कामाला मोठ्या भेगा पडल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, हा बंधारा परिसरातील शेतकरी व रस्त्याच्या वाहतुकी...
error: Content is protected !!