नांदेडक्राईम

Anti-gutkha operation : नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी कारवाई; १७ जण अटकेत, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिबंधित तंबाखूविरोधात मोहीम तीव्र; लाखोंचा माल जप्त

नांदेड | नांदेड परिक्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला वेग आला असून तिसऱ्याच दिवशी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत आणखी १७ जणांना अटक करण्यात आली असून सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली १६ ते ३१ मार्च दरम्यान ही मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी गुटखा विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध १५ गुन्हे नोंदवण्यात आले.

या कारवाईत नांदेड जिल्ह्यात ७, परभणीमध्ये ४, लातूरमध्ये ३ आणि हिंगोलीमध्ये १ अशा एकूण १५ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या सर्व कारवायांमधून ४ लाख ९६ हजार ६ रुपयांचा गुटखा व संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांकडून स्वादिष्ट तंबाखू, पान मसाला, खर्रा, मावा यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांच्या साठवणूक व विक्रीवर भारतीय न्याय संहिता कलम १२३ अंतर्गत कठोर कारवाई केली जात आहे. या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळल्यास आरोपींना दहा वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.

दरम्यान, नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना देण्यासाठी ‘खबर’ ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून ९१ ५० १०० १०० या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. गुटखा विरोधी ही मोहीम पुढील काही दिवस अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button