Anti-gutkha operation : नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी कारवाई; १७ जण अटकेत, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड | नांदेड परिक्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला वेग आला असून तिसऱ्याच दिवशी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत आणखी १७ जणांना अटक करण्यात आली असून सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली १६ ते ३१ मार्च दरम्यान ही मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी गुटखा विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध १५ गुन्हे नोंदवण्यात आले.
या कारवाईत नांदेड जिल्ह्यात ७, परभणीमध्ये ४, लातूरमध्ये ३ आणि हिंगोलीमध्ये १ अशा एकूण १५ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या सर्व कारवायांमधून ४ लाख ९६ हजार ६ रुपयांचा गुटखा व संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांकडून स्वादिष्ट तंबाखू, पान मसाला, खर्रा, मावा यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांच्या साठवणूक व विक्रीवर भारतीय न्...
