HomeनांदेडAmbekar Statue : आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा...

Ambekar Statue : आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा – आ. बाबुराव पाटील कदम यांच्याकडे मागणी

हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव शहरातील आंबेडकर चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, यासाठी बसस्थानक परिसरातील उपलब्ध खुली जागा देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली आहे.

नगरसेवक अमितकुमार अरसूळ, लक्ष्मणराव काळबांडे, सचिन सूर्यवंशी, रविशंकर गुडूप, किशोर भोस्कर, नगरसेविका सिमा अमोल नरवाडे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी हदगाव–हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव पाटील कदम यांच्याकडे निवेदन सादर केली आहे. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हदगाव तालुक्याचा इतिहास पाहता हा तालुका आंबेडकरी चळवळीचा महत्त्वाचा केंद्रबिंदू राहिला आहे.

सामाजिक परिवर्तनासाठी अनेक चळवळी व क्रांतिकारी उपक्रम याच तालुक्यातून घडलेले आहेत. मात्र,शहराच्या मध्यवर्ती भागात अद्यापही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारलेला नाही, ही खंत व्यक्त करण्यात आली आहे.

त्यामुळे शहरातील बसस्थानक परिसरातील मोकळी जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य व आकर्षक पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी केली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments