Ambekar Statue : आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा – आ. बाबुराव पाटील कदम यांच्याकडे मागणी
हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव शहरातील आंबेडकर चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, यासाठी बसस्थानक परिसरातील उपलब्ध खुली जागा देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली आहे.
नगरसेवक अमितकुमार अरसूळ, लक्ष्मणराव काळबांडे, सचिन सूर्यवंशी, रविशंकर गुडूप, किशोर भोस्कर, नगरसेविका सिमा अमोल नरवाडे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी हदगाव–हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव पाटील कदम यांच्याकडे निवेदन सादर केली आहे. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हदगाव तालुक्याचा इतिहास पाहता हा तालुका आंबेडकरी चळवळीचा महत्त्वाचा केंद्रबिंदू राहिला आहे.
सामाजिक परिवर्तनासाठी अनेक चळवळी व क्रांतिकारी उपक्रम याच तालुक्यातून घडलेले आहेत. मात्र,शहराच्या मध्यवर्ती भागात अद्यापही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारलेला नाही, ही...
