HomeकृषीStrom hits : हिमायतनगर तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा; उन्हाळी ज्वारी जमीनदोस्त

Strom hits : हिमायतनगर तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा; उन्हाळी ज्वारी जमीनदोस्त

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| तालुक्यात सोमवारी सायंकाळी अचानक वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी उन्हाळी ज्वारी, गहू आदी पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत.

विशेषतः पवना येथील शेतकरी अवधुत परमेश्वर तमलवाड यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्या शेतातील ज्वारी व गव्हाचे पीक आडवे पडून संपूर्ण पिकाची नासाडी झाली आहे. कापणीच्या उंबरठ्यावर असलेले पीक वाऱ्याच्या तडाख्यात कोसळल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.

IMG 20260224 WA0001 Strom hits : हिमायतनगर तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा; उन्हाळी ज्वारी जमीनदोस्त

सदर घटनेमुळे परिसरातील शेतकरी चिंतेत असून, शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

IMG 20260224 WA0004 Strom hits : हिमायतनगर तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा; उन्हाळी ज्वारी जमीनदोस्त

दरम्यान, विजांच्या कडकडाटामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments