HomeनांदेडUnseasonably Rain : हिमायतनगरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; महाशिवरात्री यात्रेत व्यापाऱ्यांची तारांबळ,...

Unseasonably Rain : हिमायतनगरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; महाशिवरात्री यात्रेत व्यापाऱ्यांची तारांबळ, मोठी दुर्घटना टळली

हिमायतनगर (अनिल  मादसवार ) शहर व परिसरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे शहरात सुरू असलेल्या महाशिवरात्री यात्रेत व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी तंबू, स्टॉल व साहित्य भिजल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.

दरम्यान, यात्रास्थळाजवळील विद्युत तारा तुटून खाली पडल्याचे काही नागरिकांच्या लक्षात येताच तत्काळ वीज पुरवठा पुरवठा करणाऱ्याला माहिती देण्यात आली. संबंधित यंत्रणेने प्रसंगावधान राखत तातडीने वीज पुरवठा बंद केला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पावसामुळे विद्युत प्रवाह परिसरात पसरला असता तर गंभीर अपघात होण्याची शक्यता होती, अशी चर्चा उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

IMG 20260223 161119 Unseasonably Rain : हिमायतनगरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; महाशिवरात्री यात्रेत व्यापाऱ्यांची तारांबळ, मोठी दुर्घटना टळली
Oplus_16908288

पावसामुळे यात्रेत आलेल्या भाविकांची काही काळ गैरसोय झाली. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी स्टॉल कोसळल्याचीही माहिती आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्थानिक यात्रा प्रशासन व वीज वितरण विभागाने परिस्थिती नियंत्रणात आणत आवश्यक ती खबरदारी घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments