Homeक्राईमSuicide Case : आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यास विलंब; नातेवाईकांचा...

Suicide Case : आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यास विलंब; नातेवाईकांचा आक्षेप

हदगाव, गौतम वाठोरे | हदगाव येथील एका युवकाच्या आत्महत्येप्रकरणी संबंधितांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मृताच्या कुटुंबीयांनी केली असून, यासंदर्भात पोलिसांकडून विलंब होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तीन दिवसांपूर्वी अनिल गणेशराव शिंदे या युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर मृताच्या कुटुंबीयांनी हदगाव पोलीस ठाण्यात तक्रार देत काही व्यक्तींनी मानसिक छळ केल्यामुळेच हा टोकाचा निर्णय घेतल्याचा दावा केला आहे. मात्र, तक्रार दिल्यानंतरही अद्याप संबंधितांवर गुन्हा दाखल झालेला नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वाहन अपघाताच्या प्रकरणातून वाद निर्माण झाला होता. अपघाताच्या भरपाईपोटी मोठ्या रकमेची मागणी व कथित धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या मानसिक तणावातून अनिल शिंदे यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या भावाने केला आहे.

दरम्यान, पोलिसांकडून तक्रारीची चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कारवाई होत नसल्याने कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या घटनेमुळे शहरात विविध चर्चा सुरू असून, पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संबंधित प्रकरणात अधिकृत भूमिका जाणून घेण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments