Suicide Case : आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यास विलंब; नातेवाईकांचा आक्षेप
हदगाव, गौतम वाठोरे | हदगाव येथील एका युवकाच्या आत्महत्येप्रकरणी संबंधितांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मृताच्या कुटुंबीयांनी केली असून, यासंदर्भात पोलिसांकडून विलंब होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तीन दिवसांपूर्वी अनिल गणेशराव शिंदे या युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर मृताच्या कुटुंबीयांनी हदगाव पोलीस ठाण्यात तक्रार देत काही व्यक्तींनी मानसिक छळ केल्यामुळेच हा टोकाचा निर्णय घेतल्याचा दावा केला आहे. मात्र, तक्रार दिल्यानंतरही अद्याप संबंधितांवर गुन्हा दाखल झालेला नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वाहन अपघाताच्या प्रकरणातून वाद निर्माण झाला होता. अपघाताच्या भरपाईपोटी मोठ्या रकमेची मागणी व कथित धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या मानसिक तणावातून अनिल...
