नांदेडसोशल वर्क

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

लोहा| त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२८ वी जयंती लोहा शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. क्रांतिसूर्य बुद्ध विहारातून निघालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या भव्य रथयात्रेने शहरातील मुख्य रस्त्यांवरून मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेली ही मिरवणूक पुन्हा क्रांतिसूर्य बुद्ध विहारात विसर्जित करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व पूजापाठाने करण्यात आली. त्यानंतर माता रमाई जयंती सोहळ्यास प्रारंभ झाला.

गेल्या वर्षापासून माता रमाई जयंतीचे आयोजन आंबेडकरी चळवळीतील महिलांच्या पुढाकाराने होत असून यंदाही महिलांनी मोठ्या उत्साहात हा सोहळा यशस्वी केला. महिला मंडळाच्या अध्यक्षा सुशीला महाबळे यांच्या नेतृत्वाखाली सीमा कांबळे, राजश्री हटकर, मनीषा ढगे, रोहिणी महाबळे, लक्ष्मीबाई शिंगारपूरले, वनमाला गायकवाड, सीमा पाईकराव, जयमाला महाबळे, सुनंदा खाडे, सरिता महाबळे, सुजाता कापुरे, वैशाली धुतमल, सत्यशीलाबाई भोळे, हेमा निखाते, बेबी महाबळे आदी महिलांनी विशेष परिश्रम घेतले.

1001500086 Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

सकाळी नगराध्यक्ष शरद पाटील पवार यांनी माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन केले. या जयंती सोहळ्यास माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, ज्येष्ठ कार्यकर्ते गंगाधर महाबळे, बालाजी खिल्लारे, माजी नगरसेवक बबन निर्मले, उत्तम महाबळे, माजी नगराध्यक्षा त्रिशलाबाई कांबळे, नगरसेवक सतीश निखाते, नगरसेविका लक्ष्मीताई धुतमल, पूजा खिलारे, केतन खिल्लारे, अनिल धुतमल, पुष्पलता कापुरे, व्ही. के. कांबळे, बी. बी. गायसमुद्रे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस रत्नाकर महाबळे, तालुकाध्यक्ष बापुसाहेब कापुरे, केंद्रीय शिक्षक धोंडीबा यानभूरे, शहराध्यक्ष सिद्धार्थ महाबळे, अनिल गायकवाड, कचरे सर, अभि वाघमारे, सुरेश महाबळे, ज्येष्ठ पत्रकार हरिहर धुतमल, डी. एन. कांबळे, प्रा. डॉ. शैलेंद्र महाबळे, विलास सावळे यांच्यासह मोठ्या संख्येने उपासक-उपासिका उपस्थित होते. महिलांच्या संघटित प्रयत्नातून माता रमाई जयंतीचा हा उपक्रम गेल्या वर्षापासून सातत्याने राबविला जात असून यामुळे सामाजिक एकतेचा संदेश दिला जात आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!