Homeनांदेडroad-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरापासून पळसपूर–डोलारी – सिरपल्ली सर्कलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुरू असलेले रस्ते व पुलाचे काम अत्यंत निकृष्ट, अनियमित आणि धोकादायक पद्धतीने सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. औरंगाबाद येथील मुख्य ठेकेदारामार्फत मंजूर झालेले हे काम हादगाव तालुक्यातील एका सब-ठेकेदाराकडून केले जात असून, प्रत्यक्ष कामात नियम, दर्जा व सुरक्षिततेची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचा आरोप स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने माध्यमांशी बोलताना केला आहे.

या रस्त्यावर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येतो. अशा ठिकाणी नियमानुसार दोन-तीन मोठ्या पाईप टाकून मिनी पूल (सब फुल) करणे आवश्यक असताना, शहराजवळील आशा उत्तम पेट्रोल पंप परिसरातील छोट्या नाल्यावर थेट जुन्या मातीच्या रस्त्यावर थेट डस्ट मिश्रित मटेरियल टाकून वरून घाईघाईत सिमेंट काँक्रीट करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या काँक्रीटमध्ये एकही लोखंडी गज (रॉड) न वापरता थातूरमातूर पद्धतीने काम करण्यात आले असून, हे काम पूर्ण होण्यापूर्वीच रस्ता ठिकठिकाणी भेगा पडून उखडत असल्याचे प्रत्यक्ष दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूकदार, शेतकरी आणि नागरिकांच्या जीवाशी सरळसरळ खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे.

मार्च एंडपूर्वी बिले काढण्यासाठी ठेकेदाराकडून नियमांना तिलांजली काम उरकण्याची घाई सुरू असून, त्यासाठी गुणवत्तेऐवजी फक्त कागदी पूर्णत्वावर भर दिला जात आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक शेतकरी, नागरिकांतून उमटत आहे. पावसाळ्यात याच ठिकाणी शेतकऱ्यांचे रस्ते बंद होण्याचा व शेतीचे मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या प्रकरणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे मुन्ना भाऊ शिंदे व बालाजी ढोणे यांनी माध्यमांशी बोलताना ठेकेदार व प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले, “या कामाची तात्काळ गुणवत्ता नियंत्रण मापक मशीनद्वारे चौकशी करावी. जिथे पाण्याचा प्रवाह आहे तिथे किमान दोन-तीन पाईप टाकून मिनी पूल उभारावा. जर बोगस व निकृष्ट काम सिद्ध झाले, तर संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून त्याची एजन्सी काळ्या यादीत टाकावी.

IMG20260208152955 01 road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
oplus_0

”ते पुढे म्हणाले,“जर प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही, तर याच ठिकाणी टेन्ट टाकून तीव्र आंदोलन उभे करू. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना मोकळे सोडणार नाही असा इशारा दिला आहे.”हा रस्ता विकासासाठी की… ठेकेदारांच्या बिलांसाठी… जनतेचा बळी देण्यासाठी? असा सवाल आता हिमायतनगर परिसरात जोर धरू लागला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments