road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरापासून पळसपूर–डोलारी - सिरपल्ली सर्कलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुरू असलेले रस्ते व पुलाचे काम अत्यंत निकृष्ट, अनियमित आणि धोकादायक पद्धतीने सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. औरंगाबाद येथील मुख्य ठेकेदारामार्फत मंजूर झालेले हे काम हादगाव तालुक्यातील एका सब-ठेकेदाराकडून केले जात असून, प्रत्यक्ष कामात नियम, दर्जा व सुरक्षिततेची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचा आरोप स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने माध्यमांशी बोलताना केला आहे.
या रस्त्यावर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येतो. अशा ठिकाणी नियमानुसार दोन-तीन मोठ्या पाईप टाकून मिनी पूल (सब फुल) करणे आवश्यक असताना, शहराजवळील आशा उत्तम पेट्रोल पंप परिसरातील छोट्या नाल्यावर थेट जुन्या मातीच्या रस्त्यावर थेट डस्ट मिश्रित मटेरियल टाकून वरून घाईघाईत सिमेंट काँक्रीट करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे या ...
