Homeनांदेडकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना व स्वाभिमान योजने अंतर्गत मंजूर झालेली जमीन...

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना व स्वाभिमान योजने अंतर्गत मंजूर झालेली जमीन वाटप करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण – NNL

नांदेड| वस्ताद लहुजी साळवे यांच्या नावाची कमान लावण्याच्या वादातून जातीयवादाकडून संदीप गंगाधर जाधव यांची निघृण हत्या करण्यात आली होती. पिडीत कुटूंबाला दिलासा म्हणून शासनाने 2 एकर जमीन मंजूर करण्यात आली होती. ती पिडीत मंजूर झालेली जमीन देण्यास सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, नांदेड हे गेल्या चार वर्षापासून टाळाटाळ करीत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार दि.24 जून 2024 पासून पिडीत वंचित लाभार्थी गंगाधर जाधव यांनी आमरण उपोषणास सुरूवात केली आहे. आजचा उपोषणाचा चौथा दिवस आहे.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजने अंतर्गत 2 एकर जमीन बागायत जमीन मिळवून देण्याचे पत्र शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी नांदेड व लाभार्थ्याला दिले होते. सर्व कागदपत्रांची पुर्तता करूनही नांदेड येथील सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय यांनी विनाकारण टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हाधिकारी नांदेड व स.आयुक्त समाजकल्याण कार्यालय, नांदेड यांना वेळोवेळी निवेदने व प्रत्यक्ष भेटून विनंती केली असता कोणतीच कार्यवाही होत नसल्याने अखेर दि.24 जून 2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गंगाधर जाधव यांनी आमरण उपोषणास सुरूवात केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments