नांदेड| शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त सोमवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता नांदेडच्या शंकरराव चव्हाण सभागृहात भक्ती, संगीत आणि अभंग परंपरेचा सुरेल संगम असलेला ‘सकळ सिद्धी गजानन’ अभंग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

आधुनिक महिपती संत दासगणू महाराजांच्या गजानन विजय या ग्रंथावर आधारित नांदेडचे कवी देवीदास फुलारी यांनी रचलेले २१ अभंग, तर दशरथ पुजारी यांच्या शिष्या आनंदी विकास यांनी या अभंगांना संगीतबद्ध केले आहे. कार्यक्रमाचे प्रभावी निरूपण प्रख्यात निवेदक अॅड. गजानन पिंपरखेडे करणार आहेत.

या अभंग रचनांचे लोकार्पण खासदार तथा माजी मुख्यमंत्री मा. अशोकरावजी चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछेडे, अमरनाथ राजुरकर, डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अबीनाश कुमार, डॉ. महेश कुमार डोईफोडे आणि शंतनु डोईफोडे यांच्या उपस्थितीत होणार आहे.


महोत्सवात साईप्रसाद पांचाळ, वैभव पांडे, वर्षा जोशी, विलीना पात्रा हे नामांकित गायक सहभागी होणार असून, पंकज शिरभाते (व्हायोलिन), विठ्ठल चुनाळे (बासरी) आणि विश्वेश्वर कोलंबीकर (मृदंग) यांच्या वादनामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार ठरणार आहे. ललित कला प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या अभंग महोत्सवास रसिक, भाविक व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बालाजी इबितदार व राम शेट्टी तुप्तेवार यांनी केले आहे.


