HomeनांदेडBibatyacha Wawar : मांडवी–किनवट परिसरात बिबट्याचा वावर; शेतात पायांचे ठसे आढळल्याने नागरिकांत...

Bibatyacha Wawar : मांडवी–किनवट परिसरात बिबट्याचा वावर; शेतात पायांचे ठसे आढळल्याने नागरिकांत दहशत

किनवट/नांदेड| मांडवी ते किनवट या रहदारीच्या रस्त्यालगत बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट संकेत मिळाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मांडवी–किनवट रस्त्यावरील सरस विद्यालयाच्या पाठीमागील शेतात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले असून, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

सरस विद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या प्रियांका राठोड यांच्या सर्व्हे नंबर १०५ मधील शेतात मजुरांना पिकांची नासधूस झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पाहणी केली असता संशयास्पद जनावरांचे पायांचे ठसे आढळून आले. ही माहिती त्यांनी शेतमालक प्रबोध राठोड यांना दिली. त्यानंतर राठोड यांनी तातडीने मांडवी वनपरिक्षेत्र कार्यालयाशी संपर्क साधून माहिती दिली.

IMG 20260203 WA0036 Bibatyacha Wawar : मांडवी–किनवट परिसरात बिबट्याचा वावर; शेतात पायांचे ठसे आढळल्याने नागरिकांत दहशत

वन विभागाची तातडीची पाहणी
वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष शिरसेटवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नीलेश तायडे, वनरक्षक माधव रायमले व यू. जी. सोनटक्के यांनी घटनास्थळी पाहणी केली. पाहणीदरम्यान आढळलेले पायांचे ठसे बिबट्याचे असल्याची प्राथमिक पुष्टी वन विभागाने केली आहे.

ट्रॅप कॅमेरे बसविणार
बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी संबंधित परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.

नागरिकांना सावधगिरीचे आवाहन मांडवी ते किनवट हा मार्ग आदिलाबाद (तेलंगणा) कडे जाणारा महत्त्वाचा व वर्दळीचा रस्ता असून, याच परिसरात सरस विद्यालय व खान अब्दुल गफार खान नेत्र रुग्णालय असल्यामुळे नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकट्याने शेतात किंवा निर्जन ठिकाणी जाणे टाळावे, लहान मुलांवर लक्ष ठेवावे, संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाला कळवावे,असे आवाहन वन विभागाने केले आहे. बिबट्याच्या वावरामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाकडून पुढील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments