Friday, May 15

Tag: due to finding of Shetaat Payanche

Bibatyacha Wawar : मांडवी–किनवट परिसरात बिबट्याचा वावर; शेतात पायांचे ठसे आढळल्याने नागरिकांत दहशत

Bibatyacha Wawar : मांडवी–किनवट परिसरात बिबट्याचा वावर; शेतात पायांचे ठसे आढळल्याने नागरिकांत दहशत

नांदेड, कृषी
किनवट/नांदेड| मांडवी ते किनवट या रहदारीच्या रस्त्यालगत बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट संकेत मिळाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मांडवी–किनवट रस्त्यावरील सरस विद्यालयाच्या पाठीमागील शेतात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले असून, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. सरस विद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या प्रियांका राठोड यांच्या सर्व्हे नंबर १०५ मधील शेतात मजुरांना पिकांची नासधूस झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पाहणी केली असता संशयास्पद जनावरांचे पायांचे ठसे आढळून आले. ही माहिती त्यांनी शेतमालक प्रबोध राठोड यांना दिली. त्यानंतर राठोड यांनी तातडीने मांडवी वनपरिक्षेत्र कार्यालयाशी संपर्क साधून माहिती दिली. वन विभागाची तातडीची पाहणी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष शिरसेटवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नीलेश तायडे, वनरक्षक माधव रायमले व यू. जी...
error: Content is protected !!