HomeनांदेडGuru Ravidas Maharaj : सिरंजणी येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची...

Guru Ravidas Maharaj : सिरंजणी येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) मौजे सिरंजणी येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६४९ वी जयंती भक्तिभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, समाजातील ज्येष्ठ मंडळी तसेच नवयुवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

जयंतीचे औचित्य साधून गुरु रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. समाजातील एकात्मता, समता, बंधुता व सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या गुरु रविदास महाराजांच्या विचारांचे स्मरण यावेळी करण्यात आले. प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.

या प्रसंगी माजी सरपंच सुभाष शिल्लेवाड, सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड, बालाजी मॅकलवाड, हनुमान वासुदेव, दशरथ सावळे, तुकाराम वासुदेव, श्रीराम वासुदेव, दिगांबर वासुदेव, हरिदास डोंगरे, दत्ता वासुदेव, आडेलु भाटे, सुरेश शिल्लेवाड, बाब्रुगन गड्डमवार, ज्ञानेश्वर सब्बनवार, दिगांबर डोंगरे, विनोद खंडारे, परमेश्वर वासुदेव, जयवंता वासुदेव, अमोल वासुदेव, गणपत डोंगरे, संभाजी वासुदेव, शंकर वासुदेव, पांडुरंग वासुदेव, रामदास डोंगरे यांच्यासह बहुसंख्य गावकरी उपस्थित होते.

IMG 20260202 084829 Guru Ravidas Maharaj : सिरंजणी येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
Oplus_16908288

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी गुरु रविदास महाराजांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला. या जयंती सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय व सामाजिक ऐक्याच्या वातावरणाने भारावून गेला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments