Guru Ravidas Maharaj : सिरंजणी येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) मौजे सिरंजणी येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६४९ वी जयंती भक्तिभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, समाजातील ज्येष्ठ मंडळी तसेच नवयुवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
जयंतीचे औचित्य साधून गुरु रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. समाजातील एकात्मता, समता, बंधुता व सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या गुरु रविदास महाराजांच्या विचारांचे स्मरण यावेळी करण्यात आले. प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी माजी सरपंच सुभाष शिल्लेवाड, सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड, बालाजी मॅकलवाड, हनुमान वासुदेव, दशरथ सावळे, तुकाराम वासुदेव, श्रीराम वासुदेव, दिगांबर वासुदेव, हरिदास डोंगरे, दत्ता वासुदेव, आडेलु भाटे, सुरेश शिल्लेवाड, बाब्रुगन गड्डमवार, ज्ञानेश्वर सब्बनवार, दिगांबर...
