HomeनांदेडAjitdada Pawar : देगलूर नगरपालिकेत स्व. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक...

Ajitdada Pawar : देगलूर नगरपालिकेत स्व. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्याची मागणी

देगलूर (जि. नांदेड) | महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अजितदादा अनंतराव पवार यांच्या स्मरणार्थ देगलूर नगरपालिका हद्दीत योग्य जागा उपलब्ध करून भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य – मराठवाडा विभागाचे अध्यक्ष धनाजी जोशी यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

धनाजी जोशी यांनी एक सामाजिक बांधिलकी जपत वैयक्तिक पुढाकारातून ही मागणी प्रशासनापुढे मांडली असून, निवेदनात स्व. अजितदादा पवार यांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीचा व राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.

सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून शेतीला दिलेले बळ, कृषी विकास, ग्रामीण भागाचा कायापालट, पायाभूत सुविधा, तसेच प्रशासनातील धाडसी व लोकाभिमुख निर्णयांमुळे स्व. अजितदादा पवार यांनी सामान्य जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शेतकरी, कष्टकरी, युवक व वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली असून त्यांच्या नेतृत्वामुळे राज्यातील अनेक महत्त्वाकांक्षी विकासकामे मार्गी लागली, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

IMG 20260201 WA0021 Ajitdada Pawar : देगलूर नगरपालिकेत स्व. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्याची मागणी

नुकत्याच 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात त्यांचे अकाली निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अशा परिस्थितीत देगलूर नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना, एका ओबीसी नेत्याकडून करण्यात आलेली ही मागणी सध्या देगलूर तालुक्यात विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

स्व. अजितदादा पवार यांच्या कार्यातून भावी पिढीला प्रेरणा मिळावी व त्यांच्या कार्याची कायमस्वरूपी आठवण राहावी, यासाठी देगलूर नगरपरिषद हद्दीत किमान एक एकर जागा उपलब्ध करून स्मारक उभारण्यात यावे, अशी ठाम मागणी धनाजी जोशी यांनी निवेदनात केली आहे. तसेच या निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनाही पाठविण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

मुख्याधिकाऱ्यांनी सदर निवेदन स्वीकारून या विषयावर योग्य त्या स्तरावर विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. एका व्यक्तीने सामाजिक भावनेतून पुढाकार घेत मांडलेली ही मागणी सध्या विविध स्तरांतून पाठिंबा मिळवत असून, देगलूरच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात ती चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments