नवी दिल्ली| प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सन 2025 साठीच्या जीवन रक्षा पदक पुरस्कारांची घोषणा केली. या प्रतिष्ठित सन्मानासाठी महाराष्ट्रातील श्रीमती रूपाली प्रतापराव कदम यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या असामान्य शौर्य व धैर्यपूर्ण कर्तृत्वाची दखल घेत त्यांना ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर करण्यात आले आहे.


जीवन धोक्यात असतानाही दुसऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी दाखविलेल्या अदम्य धैर्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. रूपाली कदम यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. यंदा देशभरातून एकूण 30 जणांना जीवन रक्षा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये

6 ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक’ (मरणोत्तर), 6 ‘उत्तम जीवन रक्षा पदक’, तर 18 जणांना ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले आहे. रूपाली कदम यांची निवड ही समाजातील धाडसी व्यक्तींसाठी प्रेरणादायी ठरणारी असून, त्यांच्या कार्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



