HomeBlogआई वडिलांचे छत्र हरवलेल्या माधवची एमबीबीएसला निवड आजी व चुलता चुलतीच्या परिश्रमाचे...

आई वडिलांचे छत्र हरवलेल्या माधवची एमबीबीएसला निवड आजी व चुलता चुलतीच्या परिश्रमाचे यश

उस्माननगर l उस्माननगर ( मोठी लाठी) ता.कंधार येथील एका काबाडकष्ट करून प्रपंच चालवणाऱ्या गरीब घरातील लहानपणीच वयाच्या तिसऱ्या वर्षी वडीलाचे आणि आईचे तेरा वर्षाचा असताना आईचे छत्र हरवलेल्या माधवची शिक्षण शिकवून आई वडिलांची आठवणीत काळजावर दगड ठेवून एमबीबीएस ची तयारीत असलेल्या माधव गोविंद इसादकर डाॅक्टर होण्यासाठी निवड झाल्याने आजी व चुलता चुलतीच्या परिश्रमाला यश आले.

उस्माननगर ता.कंधार येथील कै .माधव इसादकर व गोविंद इसादकर गावातील गुरेढोरे राखून चारून आपला कुटुब चालवत असे. एवढ्या कठीण प्रसंगात ईसादकर कुटुंबात गोविंद ईसादकर सुध्दा ढोराची रखवली करत त्यांनी संसार सुखाचा चालवत असताना माधवचा जन्म झाला. पण काळाने झडप घालून माधव तीन वर्षाचा असताना गोविंद इसादकर यांचे दुःखदायक निधन झाले. माधव आठवीला असताना माधवच्या आईचे निधन झाले .

माधव पोरका झाला होता. डोक्यावरील छत्र हरपले. पण माधवला आई वडीलाची कमतरता भासू नये म्हणून आजी , काका सुरेश, अंटी यांनी आपल्या मुला प्रमाणे त्याचे लाड केले. शिक्षणासाठी खर्च उचलला. लहानपणापासून माधव हा अभ्यासात हुशार, जिद्दी, तळमळ होती. त्याच तळमळीने, जिद्दीने मेहनत करून बारावी परिक्षेत घवघवीत यश प्राप्त करून त्याचे वैद्यकीय क्षेत्रातील स्वप्न पाहुण माधवच्या पाठीमागं सक्षम उभ राहून टिईटी ची परीक्षा उत्तीर्ण झाला.आणि एमबीबीएस साठी निवड झाली.

ही एमबीबीएस ची निवड पाहुन माधवचे डोळे पाणावले. एका छोट्याश्या कुटुंबातील व आई वडीलाचे लहान पणीच निधन झाल्याने खचुन न जाता ध्येय गाठत राहुन आज खरोखरच त्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. आजी काका अंटी यांनी माधवला एमबीबीएस साठी निवड करण्यात सिहाचा वाटा आहे. माधव गोविंद इसादकर त्यांच्या निवडी बद्दल परिसरात त्याचे कौतुक होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments