Homeक्राईमSindkhed police ; शेतकऱ्याचा चोरीस गेलेला ट्रॅक्टर व पेरणी यंत्र अवघ्या १२...

Sindkhed police ; शेतकऱ्याचा चोरीस गेलेला ट्रॅक्टर व पेरणी यंत्र अवघ्या १२ तासांत जप्त ; सिंदखेड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

माहूर l माहूर तालुक्यातील वडसा येथील शेतकरी शंकर दत्तात्रय चारोडे यांच्या शेतीकामासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर व पेरणी यंत्राची चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध सिंदखेड पोलिसांनी अवघ्या १२ तासांत लावत यवतमाळ येथून मुद्देमाल जप्त केला. या धडाकेबाज कारवाईमुळे सिंदखेड पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वडसा येथील शेतकरी शंकर दत्तात्रय चारोडे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्यानुसार, त्यांच्या मालकीचा सोनालिका छत्रपती कंपनीचा ट्रॅक्टर व पेरणी यंत्र दिनांक १४ रोजी रात्री चोरीस गेले होते. अल्पावधीत चोरीचा छडा लावणे व मुद्देमाल जप्त करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमेश जाधवर, तपास अधिकारी डी. जी. चव्हाण, जमादार संजय शेंडे व संदीप वानखेडे यांनी तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

IMG 20251219 WA0003 Sindkhed police ; शेतकऱ्याचा चोरीस गेलेला ट्रॅक्टर व पेरणी यंत्र अवघ्या १२ तासांत जप्त ; सिंदखेड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

या कारवाईत तब्बल ७ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल यवतमाळ येथून जप्त करण्यात आला असून आरोपी पीयूष दिलीप मुंनगीलवार, रोहित पावडे व शेख सलमान शेख माजीद (तिघेही राहणार वडसा, ता. माहूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या चोरीप्रकरणात निष्पन्न झालेल्या आरोपींची नावे समोर येताच वडसा गावासह माहूर परिसरात खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांमध्ये सिंदखेड पोलिसांच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments