श्रीक्षेत्र माहूर l नांदेड जिल्ह्यातील माहूर आगारामार्फत आमदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पिंटू पाटील यांच्या अथक प्रयत्नातून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच माहूर ते सिंदखेड बस सेवा सुरू करण्यात आली असून माहूर सिंदखेड या मार्गावरील शालेय विद्यार्थ्यांसह दैनंदिन कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करणाऱ्यांना नागरीकांना सोयीचा प्रवास मिळणार असल्याने युवानेते पिंटू उर्फ लक्ष्मीकांत पाटील वायफनिकर यांचे शालेय विद्यार्थ्यांसह सर्व स्तरातून आभार व्यक्त करण्यात येत आहे.


सिंदखेड ते माहूर या मार्गावर अनेक लहान मोठ्या गावांचा समावेश आहे.परिसरातील नागरिकांना शासकीय,दैनंदिन कामासाठी,तसेच माहूर या तालुक्याच्या ठिकाणी दररोज ये – जा करावी लागते.मात्र बससेवेअभावी शालेय विद्यार्थ्यांना,ज्येष्ठ नागरिकांसह सामान्य जनतेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.परणामी परिसरात काही शालेय विद्यार्थ्यांना पायदळी जाऊन शिक्षण घ्यावे लागत होते.


विद्यार्थी व नागरिकांच्या गरजेला ओळखून पिंटू पाटील यांनी विद्यार्थ्यांची व दैनंदिन प्रवाशांची बस सेवेअभावी होणारी गैरसोय पाहता विद्यार्थ्यांसह आंदोलन उभारून आमदार हेमंत पाटील यांच्या निदर्शनास सदर बाब आणून दिली होती.कर्तव्यदक्ष आमदार हेमंतभाऊ पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशानंतर तत्काळ माहूर ते सिंदखेड बससेवा सुरू झाली असून माहूर ते सिंदखेड प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह नागरीकांना प्रवास सोयीचा होणार आहे.दरम्यान पिंटू पाटील वायफनिकर यांनी राज्य परिवहन महामंडळ अधिकाऱ्यांसह आमदार हेमंत पाटील साहेब,शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख,शिवसेना तालुका प्रमुख माहूर सुदर्शनभाऊ नाईक यांच्यासह सर्व सहकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले.



