श्रीक्षेत्र माहूर l माहूर तालुक्यातील मौजे टाकळी येथे एका वानराने अनेक दिवसापासून येथील नागरिकांना हल्ले करून नुकसान करणे सह इतर प्रकारे उपद्रव माजवून सळो की पळो करून सोडले होते त्यामुळे येथील सरपंच आणि ग्रामसेवकांनी निवेदन देऊन सदरील वानराचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी 24 तासाच्या आत उपवन संरक्षक केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद आणि माहूर च्या कर्मचाऱ्यांची रेस्क्यू टीम बनवून स्वतः हजर राहून उपद्रवी वानरास दि 10 रोजी जेर बंद केले


उपवनसंरक्षक नांदेड केशव वाबळे सहाय्यक वनसंरक्षक किनवट किरण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रोहित जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी माहूर यांच्या आदेशान्वये वनपरिक्षेत्र कार्यालय माहूर अंतर्गत वनपरिमंडळ माहूर नियतक्षेत्र वझरा मधील मौजे टाकळी या गावात मागील काही दिवसांपासून एका नर वानर गावातील लोकांवर हल्ला करून पळून जात असे.या वानराला पुसद येथील आर आर यु टीम च्या मदतीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या निगराणीत रेस्क्यू करण्यात आले व त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.

यावेळी वनपाल माहूर मनोहर कत्तुलवार वनरक्षक दिपक माने महेश मांजलवाड आर आर यु टीम चे प्रमुख शे. मुखबीर वनरक्षक रवी राठोड, किरण सातपुते मानद वन्यजीव रक्षक पशुसेवक रवी मोरे वनसेवक कैलास जाधव व परमेश्वर नाईक यांचे सह गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते निवेदनाची दखल घेऊन तात्काळ कारवाही करून वानरास जेरबंद केल्याप्रकरणी माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांचे अभिनंदन होत आहे



