करियरनांदेड

Nanded ; नांदेड जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना जिल्हाध्यक्ष पदी कमल दर्डा यांची निवड

नांदेड l जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना ६१५ जिल्हा शाखा नांदेडच्या नुतन जिल्हाध्यक्ष निवडी च्या अनुषंगाने अशोक कासरीळीकर विभागीय अध्यक्ष व राजेशजी मामुलवार वरिष्ठ सल्लगार जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली दि. २ डिसेंबर २०२५ मंगळवार रोजी सायंकाळी ४.३० वाजता बैठक आयोजित केली होती. त्या अनुषंगाने बैठकीत नुतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष पदी- कमल दर्डा, सचिव पदी- बालाजी अटकळे, उपाध्यक्ष पदी – हरिनारायण राजे वरील प्रमाणे नुतन कार्यकारिणीची निवड करुन उर्वरित कार्यकारिणी जशास तशी ठेवण्यात आली आहे. यापुढे जिल्हा संघटनेची व तालुका संघटनेची ईतर पदे निवडण्यात येतील असे निवडी बाबतच्या सभेमध्ये जाहीर करण्यात आले.

नूतन जिल्हाध्यक्ष कमल दर्डा यांनी सांगितले की, जिल्हा परिषद कर्मचारी यांचे मासिक वेतन दर महा ५ तारखेच्या आत होईल यासाठी प्रयत्न करणार आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button