Homeनांदेडनांदेड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य लक्ष्मणरावजी शक्करगे यांच वृद्धापकाळाने निधन - NNL

नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य लक्ष्मणरावजी शक्करगे यांच वृद्धापकाळाने निधन – NNL

हिमायतनगर,अनिल मादसवार| नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य लक्ष्मणरावजी गिरजप्पा शक्करगे यांचं वृद्धापकाळाने शनिवार दि.२२ रोजी दुपारी निधन झाले. मृत्यूसमयी ते ८५ वर्षाचे होते. त्याची राजकीय कारकीर्द सरपंच, सभापती, जि.प. सदस्य व परमेश्वर मंदिर संचालक अशी होती.

त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी, 3 मुल 2 मुली, सुना, पुतणे, नातवंड असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या दि.२३ रोजी रविवारी दुपारी 12 वाजता उमरखेड – बोरी रस्त्यावरील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अशी माहिती श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी दिली.

लक्ष्मणरावजी गिरजप्पा शक्करगे यांच मोठा यांच सामाजिक, राजकीय क्षेत्रात मोठं योगदान राहिल आहे. त्यांच्या कार्यकाळात सर्वसामान्य नागरिकांच्या अडी अडचणींना प्राधान्य दिला जायचं. त्यांनी वयाच्या ८३ वर्षापर्यंत राजकीय क्षेत्रात अनेकांना मार्गदर्शन करून अनेक नेते घडविले आहेत. हदगाव हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर आपले राजकीय गुरु लक्ष्मणरावजी शक्करगे साहेबानं यांनाच मानतात.

स्व.लक्ष्मणरावजी गिरजप्पा शक्करगे यांनी आत्तापर्यंत हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, हिमायतनगर शहराचे सरपंच, हुतात्मा जयवंतराव पाटील साखर कारखाना संचालक, श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे जेष्ठ संचालक अश्या पदावर राहून सामाजिक कार्य केला आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन अनेकांनी राजकीय सामाजिक क्षेत्रात पाय ठेवला आहे. त्यांच्या जाण्याने अनेकांना दुःख झालं असून, त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच अनेकांनी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी धाव घेतली असून, गावकरी वर्गातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे. ते शिक्षक परमेश्वर शक्करगे, राम शक्करगे, पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे यांचे वडील होते. 

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments