Homeनांदेडनगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे नामनिर्देशपत्र शनिवार 15 नोव्हेंबरला स्विकारली जाणार

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे नामनिर्देशपत्र शनिवार 15 नोव्हेंबरला स्विकारली जाणार

नांदेड l नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व 1 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र सादर करावयाच्या कालावधीतील शनिवार 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात यावेत, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाले आहेत.

याअनुषंगाने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिले आहेत. या निवडणूक कार्यक्रमात रविवार या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाही असे नमूद आहे. त्यामुळे शनिवार 15 नोव्हेंबर 2025 रोजी नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात यावेत का यासंदर्भात विचारणा होत असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून वरीलप्रमाणे हे निर्देश प्राप्त झाले आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments