किनवट, परमेश्वर पेशवे। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासन स्तरावर झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देऊन वृक्ष लागवडीसाठी शासन स्तरावर करोडो रुपये खर्च केले जात आहेत तर दुसरीकडे हिमायतनगर ते कोठारी राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्यासाठी रोड लगत असलेले लाखो वृक्षाची तोड करून राष्ट्रीय महामार्ग बनवला जात आहेत. मात्र जिथे जिथे राष्ट्रीय महामार्गाचे काम झाले आहे तिथे राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने वृक्ष लागवड करण्याचे बंधनकारक असताना देखील सबंधित गुत्तेदारांनी कुठेच वृक्ष लागवड केली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने संबंधित गुत्तेदारांनी हिमायतनगर ते कोठारी या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने या पावसाळ्यात तरी वृक्ष लागवड करावी अन्यथा संबंधित गुत्तेदाराच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी घोगरे पाटील यांनी दिला आहे.


किनवट ते हिमायतनगर या राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होऊन राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी रोड लगत असलेल्या जिवंत झाडांचे मोजमाप करून सर्वे करण्यात आला आणि अनेक वर्षापासून रोड लगत असलेल्या मोठमोठ्या लाखो जिवंत झाडांची कटर मशीन च्या साह्याने तोड करून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात केली आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे काम करत असताना किनवट हिमायतनगर तालुक्यातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. अनेक वेळा तालुक्याच्या ठिकाणी या जिल्ह्याच्या ठिकाणी कामानिमित्त जाण्यासाठी नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला तर अनेक ठिकाणी जीवित हानी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत.


या रोडचे काम पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा सर्व पक्षाच्या वतीने आंदोलने ही करण्यात आली होती तर या रोडच्या कामाची गती वाढवण्यासाठी माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना अनेक वेळा भेटी घेऊन हे काम पूर्ण करण्यासाठी त्यांना गुत्तेदार तरी बदला अशी मागणी ही करण्यात आली होती.
हा राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित गुत्तेदाराकडुन काम होताना या गुत्तेदाराकडून तालुक्यातील नागरिकांना हाल आपेष्टा सहन कराव्या लागल्या या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात होऊन आज जवळपास पाच वर्ष पूर्ण झाले आहेत.


किनवट कोठारी ते हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गाचे काम आज जवळपास परिपूर्ण होत आले आहेत उर्वरित फुलांचे काम सुरू आहे या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गेली पाच वर्षे पूर्ण झाली आहेत मात्र 161 राष्ट्रीय महामार्गाच्या रोड लगत दोन्ही बाजूने आतापर्यंत एकाही वृक्षाचे लागवड केल्याचे दिसून येत नाही मात्र रोड लगत ची लाखो झाडे तोडून पर्यावरणाचा ऱ्हास बिघढवणाऱ्या संबंधित गुत्तेदारांनी या पावसाळ्यात तरी वृक्ष रोपवनाची लागवड करून जोपासना करण्यासाठी लागणारे साहित्यासह वृक्ष लागवड करावी अन्यथा संबंधित गुत्तेदाराच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी घोगरे पाटील यांनी दिला आहे.



