किनवट ते हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने वृक्ष लागवड करा अन्यथा तीव्र आंदोलन -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासन स्तरावर झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देऊन वृक्ष लागवडीसाठी शासन स्तरावर करोडो रुपये खर्च केले जात आहेत तर दुसरीकडे हिमायतनगर ते कोठारी राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्यासाठी रोड लगत असलेले लाखो वृक्षाची तोड करून राष्ट्रीय महामार्ग बनवला जात आहेत. मात्र जिथे जिथे राष्ट्रीय महामार्गाचे काम झाले आहे तिथे राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने वृक्ष लागवड करण्याचे बंधनकारक असताना देखील सबंधित गुत्तेदारांनी कुठेच वृक्ष लागवड केली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने संबंधित गुत्तेदारांनी हिमायतनगर ते कोठारी या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने या पावसाळ्यात तरी वृक्ष लागवड करावी अन्यथा संबंधित गुत्तेदाराच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी घोगरे प...
