लाेहा| धावपळीच्या या काळात आज प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे. परिणामी राेगप्रतिकारक शक्ति कमी झाली त्याचा परिणाम शरीर वेगवेगळ्या रोगांना निमंत्रण देत आहे. अशा बदलत्या जीवनशैलीमध्ये योगासनांबद्दल जनजागृती करून योगसाधना आत्मसात करणे काळाची गरज असून योगाचे महत्व अधिकचे आहे आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डाॅ.अशोकराव गवते यांनी केले.
श्री संत गाडगे महाराज महाविद्यालय, लोहा च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डाॅ.अशोकराव गवते पाटील यांनी शरीर सुदृढ व निरोगी ठेवण्यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये व्यायामाचे व योगाचे संस्कार रुजवले गेले पाहिजे. आहार घेताना सुद्धा तितकीच काळजी घ्यावी जेणेकरून आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होणार नाही. आजच्या काळात योगाचे महत्व आहे तो दररोज केला पाहिजे असे मार्गदर्शन प्राचार्य गवते पाटील यांनी केले
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री व्ही.जी. चव्हाण यांनी मार्गदर्शन केले योगशिक्षक श्री बालाजी जाधव व नागनाथ किलजे यांनी उपस्थितांना योग साधनेची प्रात्यक्षिके करून दाखवली कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डाॅ.जयराम सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन एनएसएस विभाग प्रमुख प्रा.डाॅ.शिवराज मंगनाळे यांनी केले.