हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगर शहरातील ज्येष्ठ नागरिक श्रीमती लक्ष्मीबाई बाबूराव कोटूरवार (रा. हिमायतनगर, जि. नांदेड) यांचे दिनांक 05 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी वृद्धकाळाने दुःखद निधन झाले आहे.


त्यांच्या पार्थिवावर दिनांक 06 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता बोरगडी रोड स्मशानभूमी, हिमायतनगर येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. स्वभावाने शांत, प्रेमळ आणि धार्मिक वृत्तीच्या असलेल्या लक्ष्मीबाई कोटूरवार या आपल्या कुटुंबाच्या तसेच परिसरातील अनेकांच्या जिव्हाळ्याच्या होत्या.

त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक निराधार मुलींना आपल्याकडे आसरा देऊन त्यांच्या शिक्षणासाठी मार्गदर्शन केले. यामुळे त्याना गावातील लोक अनाथांची आई अश्या नावानेही ओळखत होते. त्यांच्या निधनाने कोटूरवार परिवारावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांतही हळहळ व्यक्त होत आहे.



