हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) तालुक्यातील तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त असलेल्या मौजे श्रीक्षेत्र बोरगडी (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथे धार्मिक उत्साहात लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ६ वाजता होणार आहे.


या प्रसंगी श्रीराम भक्तीचा उत्सव, हनुमानाच्या पराक्रमाची कथा आणि लक्ष्मण शक्तीचा प्रसंग यांचे प्रभावी सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी गावातील सर्व श्रद्धाळू व युवक मंडळींनी मोठ्या उत्साहाने तयारी सुरू केली आहे.


लक्ष्मण शक्ती कार्यक्रम दरम्यान “जय श्रीराम, जय हनुमान!” या घोषणांनी परिसर भक्तिभावाने दुमदुमणार असून, श्रद्धाळूंमध्ये या कथेबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरातील भाविक-भक्त, वाचक-सुचक आणि श्रोते मंडळीं, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लक्ष्मण शक्तीचे दर्शन, श्रवण व लाभ घ्यावा, तसेच धार्मिक वातावरण अधिक मंगलमय करावे, असे आवाहन समस्त बोरगडी गावकरी मंडळींनी केले आहे.




