नांदेड| आज जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती आणि शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायतींनी स्थानिक नागरिकांसाठी योग शिबिरांचे आयोजन केले, ज्यामध्ये योगाचे महत्त्व व त्याचे फायदे विषद करण्यात आले.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी योगासने सादर केली. शिक्षकांनी योगा दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले आणि रोजच्या जीवनात योगाचे महत्त्व कसे आहे याबद्दल मार्गदर्शन केले. काही शाळांमध्ये पालकांनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला. पंचायत समिती, ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय आदी ठिाकाणी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी डासासन, वृक्षासन, भुजंगासन, धनुरासन, बज्रासन आदी योगासने करण्यत आली. आंतरराष्टीय योग दिन साजरा करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेने केले होते. त्या आवाहनास नागरिक, युवक-युवती शालेय विद्यार्थी व पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
व्यक्तिमत्व विकासासाठी योगा महत्वाचा- मंजुषा कापसे
योग साधना केल्यामुळे निरोगी शरीराबरोबरच अंतर्गत सुक्ष्म अवयवयांचा व्यायाम होतो. तसेच कार्यक्षम व्यक्तिमत्त्व विकसित होते, असे प्रतिपादन उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी केले. विष्णुपुरी येथील जिल्हा परिषद हायस्कुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी गट विकास अधिकारी पांडूरंग नारवटकर, वैद्यकिय अधिकारी डॉ मोनिका आचमवाड आदींची उपस्थिती होती.
यावेळी श्रीमती देवशेट्टे यांनी योग साधनांचे प्रात्यक्षिके करुन दाखवली. यावेळी डॉ. आचमवाड यांनी सकस आहाराबाबत माहिती दिली. यावेळी सरपंच संध्या विलास देशमुख, राजुभाऊ हंबर्डे, उपसरपंच अर्चना विश्वनाथ हंबर्डे, संतोष हंबर्डे, उग्रसेन हंबर्डे, कालिदास बारसे, काळबा कंधारे, मुख्याध्यापक श्रीमती जाधव, विस्तार अधिकारी व्ही.. बी कांबळे, सतिश लकडे, गोविंद माजंरमकर, ग्रामविकास अधिकारी संजय कानोडे, सुभाष गीते, बचत गटाच्या वर्षा कंधारे, लक्ष्मी कंधारे आदींची उपस्थिती होती.
अर्धापूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन- अर्धापूर येथे आंतरराष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून आयुष्यमान आरोग्य मंदीर युनानी दवाखाना येथे योगासने करण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत देसाई, डॉ. दीपक आनलदास, औषध निर्माण अधिकरी श्रीमती टोम्पे, आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती. पंचायत समिती अर्धापूर येथे झाल्यालेल्या कार्यक्रमात गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी व कर्मचा-यांनी विविध योगासने केली.