नवीन नांदेड l श्री.सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे, जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र, सिडको, नवीन नांदेड आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स (मास्वे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी उपरोक्त उद्गार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रो. डॉ. अशोक महाजन यांनी काढले.


या राज्यस्तरीय चर्चासत्राचा विषय शाश्वत विकासासाठी समाजकार्याचा हस्तक्षेप : संधी व आव्हाने हा होता. चर्चासत्राच्या उद्घाटनपर भाषणात प्र. कुलगुरू प्रो.डॉ.अशोक महाजन म्हणाले की,शाश्वत विकासाचे उद्दिष्टे साध्य करण्यात भारताची भूमिका व त्यासाठी शाश्वत विकास महत्त्वाचा आहे. शाश्वत विकासात आपण आज जागतिक पातळीवर 99 व्या क्रमांकावर आहोत. यासाठी समाज कार्यकर्ता मध्यस्थीची भूमिका अदा करू करतो. सर्वांना सोबत घेऊन शाश्वत विकास आपणास साध्य करायचा आहे.


समाजाच्या विकासाबरोबरच पर्यावरणाचेही संवर्धन आपण करावे. उच्च शिक्षणामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाला आपण सुरुवात केलेली आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन तयार व्हावे. 2047 मध्ये विकसित भारत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण त्यामध्ये आपलं महत्त्वाचे योगदान द्यावे. शाश्वत विकास साध्य करण्यात समाजकार्याचे योगदान मोलाचे आहे. कौशल्यावर आधारित रोजगार या जगात खूप आहेत, त्यासाठी आपण कौशल्य संपादन करून ते रोजगार मिळवावेत. त्याचबरोबर आपण सामाजिक बांधिलकी ही जोपासावी आणि समुदायाशी आपली नाळ जोडली पाहिजे.


समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी समुदायात जाऊन त्यांच्या समस्या, प्रश्न जाणून घेऊन ते दूर करण्याचे काम करावे, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव,संस्थापक अध्यक्ष, श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड हे होते.

प्रस्तुत चर्चासत्रास बीजभाषक म्हणून प्रो. डॉ. अंबादास मोहिते,समाजशास्त्रज्ञ, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग तथा संस्थापक अध्यक्ष मास्वे हे होते. तर व्यासपीठावर प्रमुख उपस्थितीत सौ. शांतादेवी जाधव,उपाध्यक्ष, श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड. डॉ.पी.एम.शहापूरकर, प्राचार्य समाजकार्य महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर, डॉ.प्रकाश जाधव, प्राचार्य, मानवलोक समाज विज्ञान महाविद्यालय, अंबाजोगाई, डॉ. संजय फुलकर, प्राचार्य शेखर घुंगरवार, प्राचार्य एन.जी. पाटील, डॉ. अंबादास कर्डिले यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचा कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलनाने झाली आणि महाविद्यालयाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एन.जी. पाटील यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक डॉ. अंबादास कर्डिले यांनी केले. उद्घाटन सत्राचा अध्यक्षीय समारोप कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव यांनी केला. तसेच राज्यस्तरीय चर्चासत्रात महाराष्ट्रातून वेगवेगळ्या समाजकार्य महाविद्यालयातून अनेक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक संशोधक विद्यार्थी यांनी आपले शोधनिबंध सादर केले आणि आपला सक्रिय सहभाग नोंदविला.
या राज्यस्तरीय चर्चासत्रात डॉ. पी.एम.शहापूरकर, डॉ. प्रकाश जाधव, डॉ.संजय गवई, डॉ.दिनेश मौने आदींनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी डॉ. डी.एन. मोरे यांनी शाश्वत विकासात उच्चशिक्षण यावर आपले विचार व्यक्त केले. कार्यकर्माचे सूत्रसंचालन प्रा. गोपाल बडगिरे यांनी केले, तर आभार सहसंयोजक प्रा.डॉ. मेघराज कपूर यांनी मानले.
या राज्यस्तरीय चर्चासत्राची सांगता राष्ट्रगीताने झाली. सदरील कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता महाविद्यालयाचे डॉ. मनीषा मांजरमकर, डॉ. दिलीप काठोडे, डॉ. विद्याधर रेड्डी, डॉ. प्रतिभा लोखंडे, डॉ. आसिफोदिन शेख, प्रा. सुनील गोईनवाड, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. सत्वशीला वरघंटे, ग्रंथपाल सुनील राठोड, राजेश पाळेकर, संतोष मोरे, सुनील कंधारकर, नरेंद्र राठोड, गणेश तेलंग, मोहन स्वामी, राजू केंद्रे, रफिक शेख व महाविद्यालयाचे संशोधक विद्यार्थी आदींनी परिश्रम घेतले.


