उस्माननगर, माणिक भिसे| येथून जवळच असलेल्या मौजे भुत्याचीवाडी ता. कंधार येथील श्री. खंडोबा मंदिर सभागृहात महादेव कोळी समाजाचे दैवत असलेल्या महर्षी वाल्मिकी ॠषी यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरी करण्यात आली.


यावेळी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन पोलिस पाटील कैलास कागदेवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा. सरपंच माधव भुते , सरपंच प्रतिनिधी विश्वनाथ लामदाडे , वैभव मामिलवाड , सुभाष गडमवाड , मारोती गडमवाड , गोविंद कागदेवाड , परशुराम गडमवाड , लोकडु भुते , अंकुश गडमवाड, रत्नाकर गडमवाड , प्रभु गडमवाड , दत्तात्रय करेवाड , शामराव गडमवाड , माणिक गडमवाड , यांनी महर्षि वाल्मिकी ॠषी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी पोलीस पाटील कैलास कागदेवाड यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी गावातील तरुण, नागरिक उपस्थित होते.




