HomeनांदेडSharad Deshpande : ज्येष्ठांचा सन्मान हीच खरी परंपरा : शरद देशपांडे

Sharad Deshpande : ज्येष्ठांचा सन्मान हीच खरी परंपरा : शरद देशपांडे

नांदेड| ज्येष्ठांचा सन्मान हीच खरी भारतीय परंपरा आहे. ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव, मार्गदर्शन आणि आशीर्वाद हे समाजाला दिशा देणारे दीपस्तंभ आहेत. त्यामुळे त्यांच्या कल्याणासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे यांनी केले.

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) मराठवाडा प्रादेशिक विभाग (उ) नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक ज्येष्ठ नागरिक कार्यशाळेचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष अशोक तेरकर, मराठवाडा प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ महिला आघाडीचे अध्यक्षा निर्मला कोरे यांची उपस्थिती होती.

ज्येष्ठ नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. ज्येष्ठांसाठी सामाजिक न्याय भवन येथे कक्ष सुरू करण्यात आला आहे. यामध्ये त्यांना असलेल्या कौटुंबिक व सामाजिक समस्यांची नोंद या कक्षामध्ये घेण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या वयोश्री व तीर्थ दर्शन योजनेचा मोठ्याप्रमाणात लाभ घेतला.

ww 2 Sharad Deshpande : ज्येष्ठांचा सन्मान हीच खरी परंपरा : शरद देशपांडे

राज्य शासनाच्या सर्वसमावेशक धोरणामध्ये ज्येष्ठ नागरिक धोरण-2013 ची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी, उपचार शिबिरे मोठ्याप्रमाणात राबविले जात आहेत. या शिबिरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक सोयी-सुविधांचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या कक्षामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या असलेल्या कुटुंबिक तसेच इतर समस्यांची नोंदणी करावी. या प्रसंगी मंचावर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाज कल्याणचे सेवानिवृत्ती समाज कल्याण अधिकारी बापू दासरी यांनी केले तर आभार लक्ष्मण गायके यांनी मानले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments