Homeनांदेडशेकऱ्यांनो मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घ्या -NNL

शेकऱ्यांनो मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घ्या -NNL

नांदेड| नांदेड जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना-वैयक्तिक शेततळे सन 2024-25 अंतर्गत तालुकानिहाय लक्षांक वाटप करण्यात आले आहे. या लक्षांकासाठी 4 कोटी 18 लक्ष रुपयांची तरतूद मंजूर आहे.

त्यानुसार जिल्ह्याची प्रवर्गनिहाय खातेदार संख्या व पेरणी क्षेत्रानुसार तालुकानिहाय लक्षांक निश्चित करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तीक शेततळे या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तीक शेततळे सन 2024-25 अंतर्गत सर्वसाधारण, अनु.जाती, अनु. जमातीसाठी तालुका निहाय लक्षांक पुढीलप्रमाणे आहे. नांदेड -31, अर्धापूर-22, मुदखेड-25, लोहा-56, कंधार-58, देगलूर -48, मुखेड-66, नायगांव-43, बिलोली-41, धर्माबाद-23, किनवट-47, माहूर-21, हदगांव-58, हिमायतनगर-29, भोकर-33, उमरी-27 असे एकूण 628 भौतिक लक्षांक प्राप्त झाले आहे. या भौतिक लक्षांकासाठी जिल्ह्यास एकूण 4 कोटी 18 लक्ष रुपये आर्थिक तरतूद मंजूर आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments