Dr. Nilesh Khandekar ; डॉ. निलेश खांडेकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘पद्मश्री कै. एन. एस. वेंकटेशन सुवर्णपदक’

IMG 20250930 WA0015 Dr. Nilesh Khandekar ; डॉ. निलेश खांडेकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘पद्मश्री कै. एन. एस. वेंकटेशन सुवर्णपदक’

नवीन नांदेड l श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था, नांदेड येथील डॉ. निलेश खांडेकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 126 व्या दीक्षांत समारंभात शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी ‘पद्मश्री कै. एन. एस. वेंकटेशन सुवर्णपदक’ प्रदान करण्यात आला. हे सुवर्णपदक गणित विषयातील सर्वोत्तम पीएच.डी. प्रबंधासाठी दिले जाते. त्यांच्या पीएच.डी. प्रबंधाचे शीर्षक होते – “A Study of Graphs Associated with Algebraic Structures and Ordered Structures” (अ स्टडी ऑफ ग्राफ्स असोसिएटेड विथ अल्जेब्रिक स्ट्रक्चर्स अँड ऑर्डर्ड स्ट्रक्चर्स).या दीक्षांत समारंभाला चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र शासन; प्रा.डॉ.अनिल सहस्रबुद्धे,अध्यक्ष, NAAC, NBA व NETF; प्रा. डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि प्रा.डॉ.पराग काळकर, प्र-कुलगुरू, पुणे विद्यापीठ यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.खांडेकर यांचे संशोधन कार्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गणित विभागात प्रा.विनायक जोशी यांच्या दिपदर्शक मार्गदर्शनाखाली पार पडले आहे. प्रा.विनायक जोशी हे गणित विभागाचे माजी प्रमुख असून, तसेच विद्यापीठाच्या गुणवत्ता आश्वासन व सुधारणा केंद्र (IQAC) चे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

डॉ.खांडेकर यांचे पीएच.डी. दरम्यानचे संशोधन Professor Peter Cameron (प्रोफेसर पीटर कॅमेरॉन), Fellow of Royal Society, London (फेलो ऑफ रॉयल सोसायटी, लंडन) यांच्यासोबतच्या आंतरराष्ट्रीय सहकार्यामुळे अधिक वैशिष्ट्यपूर्ण ठरले. या सहकार्यामुळे त्यांना Erdős Number 2 (एर्डॉश नंबर दोन) हा दुर्मीळ सन्मान प्राप्त झाला आहे. त्यांच्या पीएच.डी. अभ्यासक्रमात त्यांनी Science Citation Index (सायन्स सायटेशन इंडेक्स) मध्ये समाविष्ट असलेल्या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमध्ये ५ हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत.

सध्या डॉ. खांडेकर हे श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था, नांदेड येथे सहाय्यक प्राध्यापक (गणित) म्हणून कार्यरत आहेत. येथे ते प्रथम व द्वितीय वर्ष बी.टेक. विद्यार्थ्यांना गणित विषयाचे अध्यापन करतात.

या विशेष यशाबद्दल संस्थेचे संचालक डॉ. मनीष कोकरे यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रा.डॉ.अरुणकुमार पाटील,गणित विभाग,संस्थेचे प्राध्यापक, यांनी देखील डॉ.खांडेकर यांचे हार्दिक अभिनंदन केले, हा सन्मान त्यांच्या वैयक्तिक यशाबरोबरच त्यांच्या संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरला आहे.डॉ. खांडेकर यांचे शैक्षणिक जीवन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून बी.एस्सी. (गणित) पदवीसह सुरू झाले, ज्यामध्ये त्यांनी विद्यापीठात तृतीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. त्यानंतर त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गणित विभागातून एम.एस्सी. (गणित) पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

एम.एस्सी. शिक्षणादरम्यान त्यांनी GATE, SET आणि CSIR-UGC NET या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांनी NET परीक्षा तीन वेळा उत्तीर्ण केली असून, एकदा अखिल भारतीय १२ वा क्रमांक मिळवला. त्यांना CSIR-JRF आणि UGC-JRF या दोन्ही नामांकित संशोधन फेलोशिप प्राप्त झाल्या. तसेच, त्यांना मराठी विज्ञान परिषदेकडून २०१६–१८ या कालावधीत पदव्युत्तर शिष्यवृत्ती देखील मिळाली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top