नवीन नांदेड| मुंबई येथे संपन्न झालेल्या 1500 मिटर महाराष्ट्र राज्य सीनियर ॲथलेटिक्समध्ये वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या बी.ए.द्वितीय वर्षाच्या कु. शिवकन्या प्रल्हाद होगे या विद्यार्थीनीने सुवर्ण पदक प्राप्त केले. या यशामुळे तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


या यशाबद्दल श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष प्रा. ॲड.श्रीनिवास जाधव यांच्या हस्ते महाविद्यालयात विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार,उपप्राचार्य डॉ. व्ही.आर.राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी डॉ.सतिष शेटे,डॉ.व्यंकटेश देशमुख, डॉ.अनिल गच्चे, डॉ.संतोष शिंदे, डॉ. आर.एम.कागणे,डॉ.दिलिप पालिमकर, डॉ.उत्तम कानवटे, डॉ.संजय गिरे,डॉ.गणेश लिंगमपल्ले, डॉ. विजयकुमार मोरे डॉ. साहेबराव शिंदे यांसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.


या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शारिरीक शिक्षण विभागप्रमुख व प्रभारी क्रीडा संचालक डॉ. साहेबराव मोरे आणि शारीरिक शिक्षण विभागाचे प्रा.डॉ.राहुल सरोदे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.शशिकांत हाटकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रो. डॉ. नागेश कांबळे यांनी केले.




