नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या एक गाव एक गणपती अंतर्गत चार गावातील व कांकाडी येथील दोन अशा सहा गणपतीचे नऊ दिवसांच्या गणपतीचे विधीवत पूजन व टाळ मृदंग जयघोषात, ढोलताशांच्या गजरात स्वागत करुन पुढच्या वर्षी लवकर या, गणपती बाप्पा मोरया या जयघोषात श्री गणरायाला निरोप देण्यात आला, यावेळी ग्रामस्थ,महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत एक गाव एक गणपती सार्वजनिक गणेशोत्सव सतरा गावात स्थापन करण्यात आले आहेत,त्या अनुषंगाने नऊ दिवसांच्या गणपती असलेल्या कांकाडी येथे 2 , सिध्दनाथ,
भायेगाव, वांगी,टापरेचौक वाजेगाव एक अशा सहा गणपतीचे विसर्जन विधीवत करण्यात आले यावेळी महाआरती, महाप्रसाद व गावातुन टाळ मृदंग जयघोषात गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती, पुढच्या वर्षी लवकर या घोषणा देत गणपती बाप्पाला गावातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढुन निरोप देण्यात आला.

यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस पाटील, गावातील सरपंच व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



