नांदेड

महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते आणि बालाजी पुयड यांच्यामध्ये शाब्दिक राडा; नांदेडमध्ये पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर – NNL

नांदेड| नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभवाची कारण मीमांसा शोधण्यासाठी भाजपचे पक्ष निरीक्षक तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आगामी २० जून रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वीच नांदेडमध्ये पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. सोमवारी झालेल्या भाजपच्या आभार बैठकीत महानराध्यक्ष आणि अन्य एका पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक राडा झाला. माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला. या प्रकारानंतर काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

काल नांदेड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीत काम केलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे जिल्ह्याभरात आभार बैठक घेत आहेत. देगलूर, बिलोली, मुखेड नंतर सोमवारी सायंकाळी नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची ताज पाटील हॉटेल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंचावर प्रताप पाटील चिखलीकर, शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर, महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, प्रवीण साले, मिलिंद देशमुख यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी भाषणाला सुरुवात करताच यावेळी बालाजी पुयड यांनी महानगराध्यक्षाने नैतिक जवाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा द्यावा. महानगराध्यक्षाने निवडणुक काळात काम केले नाही, त्यामुळे नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर मतदार संघात भाजपला लीड कमी मिळाली असा आरोप पुयड यांनी केला. कोण काम केलं कोण नाही हे मला माहिती आहे, अस म्हणत कंदकुर्ते यांनी पुयड यांना खाली बसायला सांगितले. यावरून दोघामध्ये शाब्दिक वाद झाला.

समर्थकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत हा वाद सुरु होता. अनेकांनी समजवण्याचे प्रयत्न केले. शेवटी चिखलीकर यांनी हा गोंधळ थांबवला. हा वाद थांबला असला तरी पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे नांदेड दक्षिण मध्ये आयोजित बैठकीतही असाच प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. पक्ष निरीक्षकाच्या नांदेड दौऱ्यापूर्वीच हा प्रकार घडल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button