महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते आणि बालाजी पुयड यांच्यामध्ये शाब्दिक राडा; नांदेडमध्ये पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर – NNL
नांदेड| नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभवाची कारण मीमांसा शोधण्यासाठी भाजपचे पक्ष निरीक्षक तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आगामी २० जून रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वीच नांदेडमध्ये पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. सोमवारी झालेल्या भाजपच्या आभार बैठकीत महानराध्यक्ष आणि अन्य एका पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक राडा झाला. माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला. या प्रकारानंतर काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
काल नांदेड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीत काम केलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे जिल्ह्याभरात आभार बैठक घेत आहेत. देगलूर, बिलोली, मुखेड नंतर सोमवारी सायंकाळी नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची ताज पाटील हॉटेल येथे बैठक आयोजित करण्यात आली हो...
