HomeनांदेडGauri Ganapati festival : गौरी गणपती उत्सवा निमित्त हिमायतनगर बाजारपेठेत खरेदीची लगबग

Gauri Ganapati festival : गौरी गणपती उत्सवा निमित्त हिमायतनगर बाजारपेठेत खरेदीची लगबग

हिमायतनगर, अनिल मादसवार| गौरी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगरसह परिसरातील बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. देवी गौरी व गणेशाच्या आगमनासाठी लागणारे फुलांचे हार, आकर्षक मूर्ती, सजावटीच्या वस्तू, मिठाई, कपडे, दागदागिने यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू झाली आहे.

विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन बुधवारी मोठ्या जल्लोषात होणार असून, त्याचसोबत दोन दिवसात गौरी महालक्ष्मीच्या आगमन होणार असल्याने घरोघरी तयारी केली जात आहे. उत्सवाला अवघे काही दिवस बाकी असताना बाजारात गणपतीच्या सुबक मूर्ती, गौरीचे मुखवटे व पूजेचे साहित्य दाखल झाले आहे.

IMG 20250826 WA0022 Gauri Ganapati festival : गौरी गणपती उत्सवा निमित्त हिमायतनगर बाजारपेठेत खरेदीची लगबग

उत्सवानिमित्त विशेषतः गृहिणींची बाजारपेठेत मोठी लगबग दिसून येत असून, यंदा बाजारात गौरी सजावटीसाठी अनेक नवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत. पारंपरिक पत्र्यांच्या कोठ्यांऐवजी पुणेरी स्टँड, सजावटीचे मखर आणि आकर्षक साज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. ३०० ते ७०० रुपयांदरम्यान पुणेरी स्टँड तर ३ ते ५ हजार रुपयांदरम्यान मखर स्टैण्डसह विक्रीसाठी उपलब्ध झाले असून, नागरिक त्यानुसार खरेदी करत आहेत.

IMG 20250826 WA0028 Gauri Ganapati festival : गौरी गणपती उत्सवा निमित्त हिमायतनगर बाजारपेठेत खरेदीची लगबग

गौरीसाठी दागिन्यांचीही मोठी मागणी असून, सोन्याच्या वाढत्या दरामुळे सोन्याचा मुलामा दिलेल्या कोल्हापुरी दागिन्यांना चांगली मागणी आहे. मंगळसूत्र, कंबरपट्टा, पुणेरी नथ, बाजुबंद, लक्ष्मीहार, पोहेहार, नवखाली हार, चंदेरी-सोनेरी मुकुट असे दागिने ग्राहकांना आकर्षित करत आहेत. फुलांच्या हार, कापसाच्या गुंड्या, हळद-कुंकवाचे साहित्य तसेच पूजेतील विविध वस्तूंना चांगली मागणी आहे. विक्रेत्यांनी आकर्षक सजावट करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला असून, बाजारपेठेत उत्सवी वातावरण दाटले आहे.

IMG 20250826 WA0027 1 Gauri Ganapati festival : गौरी गणपती उत्सवा निमित्त हिमायतनगर बाजारपेठेत खरेदीची लगबग

त्यातच सर्वात आवडता आणि मोठा सण गणपतीचा असल्याने विविध वेशभूषा आणि आकर्षक अश्या गणपती बाप्पाच्या मूर्ती बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत. विशेषतः फेटेवाले गणपती भक्तांना अधिक भावत असून, त्यांची मागणी वाढली आहे. एकूणच उत्सवाच्या निमित्ताने महिलांसह युवकांनीही खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली आहे. सर्वत्र “गणपती बाप्पा मोरया”च्या गजराने वातावरण भक्तिमय झाले आहे.

IMG 20250826 WA0026 Gauri Ganapati festival : गौरी गणपती उत्सवा निमित्त हिमायतनगर बाजारपेठेत खरेदीची लगबग

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments